नवी दिल्ली- खरेदी म्हटले की अनेक ग्राहक ठराविक ब्रँडच्याच वस्तुंचा आग्रह धरतात. हाच ग्राहकांचा विश्वास एका सर्व्हेतून तपासण्यात आला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. देशातील पहिल्या ७ विश्वसनीय ब्रँडमध्ये केवळ जीवन विमा महामंडळाला (एलआयसी) स्थान मिळविता आले आहे. एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर लॅपटॉप तयार करणारी डेल आहे.
देशातील पहिल्या ७ विश्वसनीय ब्रँडमध्ये 'ही' आहे एकमेव भारतीय कंपनी - Trusted Brands list
सर्वे करण्यात आलेल्या आघाडीच्या एकूण १००० ब्रँडमध्ये टाटाचे सर्वात अधिक २३ ब्रँड विश्वसनीय ठरले आहेत.
विश्वसनीय ब्रँडमध्ये ऑटोमोबाईल कंपनी जीप दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन चौथ्या तर अॅपलच्या आयफोनने पाचवे स्थान विश्वसनीय ब्रँडमध्ये मिळविले आहे.
टाटाचे सर्वात अधिक २३ ब्रँड विश्वसनीय-
सर्वे करण्यात आलेल्या आघाडीच्या एकूण १००० ब्रँडमध्ये टाटाचे सर्वात अधिक २३ ब्रँड विश्वसनीय ठरले आहेत. त्यानंतर गोदरेजचे १५ तर अमुलच्या ११ ब्रँडला ग्राहकांनी विश्वसनीय म्हणून पसंत केले आहे. तर सॅमसंगच्या ८ ब्रँडनेदेखील या यादीत स्थान मिळविले आहे. देशातील १ हजार विश्वसनीय ब्रँडपैकी सर्वात अधिक अन्न आणि शीतपेय तसेच दैनंदिन लागणाऱ्या वस्तुंचे ब्रँड आहेत. टीआरए संशोधन संस्थेने १६ देशांतील २ हजार ३१५ लोकांना प्रश्न विचारून ब्रँड सर्व्हे केले आहेत. त्यातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.