महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाळेबंदीचा फटका; स्विग्गीच्या १,१०० कर्मचाऱ्यांनी गमाविली नोकरी - स्विग्गी जॉब

स्विग्गीचे सहसंस्थापक आणि सीईओ श्रीहर्ष मजेठी म्हणाले, की स्विग्गीसाठी आजचा सर्वाधिक वाईट दिवस आहे. दुर्दैवाने आम्हाला कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागत आहे.

स्विग्गी
स्विग्गी

By

Published : May 18, 2020, 3:48 PM IST

हैदराबाद - केंद्र सरकारने टाळेबंदी ४.० घोषित केल्याच्या पहिल्याच दिवशी स्विग्गीच्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. स्विग्गीने १ हजार १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. महामारीमुळे स्विग्गीच्या देशातील व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

स्विग्गीचे सहसंस्थापक आणि सीईओ श्रीहर्ष मजेठी म्हणाले, की स्विग्गीसाठी आजचा सर्वाधिक वाईट दिवस आहे. दुर्दैवाने आम्हाला कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागत आहे.

स्विग्गी

हेही वाचा--कॉमर्स कंपन्यांना बिगर जीवनावश्यक वस्तू रेडझोनमध्येही घरपोहोच देण्याची परवानगी

कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन मिळणार आहे. जेवढे वर्ष कर्मचाऱ्यांनी कंपनीसमवेत काम केले आहे, त्या वर्षाएवढ्या महिन्यांचे अतिरिक्त वेतन कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. अशा पद्धतीने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी तीन ते जास्तीत आठ महिन्यांचे अतिरिक्त वेतन मिळणार आहे.

हेही वाचा-राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिगटाची आर्थिक पॅकेजवर बैठक

दरम्यान, नुकतेच झोमॅटोने एकूण मनुष्यबळातील सुमारे १३ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीमधून काढले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details