महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात व्यापाऱ्यांचा संघर्ष; बुधवारपासून करणार देशभरात निदर्शने

देशातील ५०० शहरात २० नोव्हेंबरला 'राष्ट्रीय निषेध दिन' पाळण्यात येणार आहे.  तसेच धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशातील ५ लाख व्यापारी सहभागी होतील, अशी सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी अपेक्षा व्यक्त केली.

संपादित छायाचित्र

By

Published : Nov 11, 2019, 6:39 PM IST

नवी दिल्ली - अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही निदर्शने येत्या बुधवारपासून करण्यात येणार असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. ई-कॉमर्स कंपन्या थेट विदेशी गुंतवणूकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा संघटनेने आरोप केला आहे.

व्यापारी संघटनेचे नेते विविध २७ राज्यांमधून सीएआयटीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय व्यापारी परिषदेत रविवारी उपस्थित राहिले. सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडलेवाल म्हणाले, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टविरोधात १३ नोव्हेंबर ते १० जानेवारी २०२० पर्यंत पुढील युद्ध सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा-जयपूरच्या राजमहालात प्रवाशांनाही करता येणार मुक्काम ; भाडे ऐकून वाटेल आश्चर्य


देशातील ५०० शहरात २० नोव्हेंबरला 'राष्ट्रीय निषेध दिन' पाळण्यात येणार आहे. तसेच धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशातील ५ लाख व्यापारी सहभागी होतील, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. देशभरात करण्यात येणाऱ्या आंदोलनाविषयी परिषदेत रोडमॅप ठरविण्यात आल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले. व्यापारी संघटना सर्व खासदारांना पत्र देवून संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याची विनंती करणार आहे.

हेही वाचा-येत्या महिनाभर बाजारात कांद्याचा भासणार तुटवडा ; पावसाने खराब मालाची आवक

पहिल्या टप्प्यात आंदोलन ६ ते ८ जानेवारीदरम्यान नवी दिल्लीत करण्यात येणार आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे सुमारे २० हजार नेते उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात ९ जानेवारीला सीएआयटी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details