महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नादारी कायद्यातील सुधारणेचा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर - Insolvency Bankruptcy Code

नादारी कायद्यातील सुधारणेच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

Prakash Javdekar
प्रकाश जावडेकर

By

Published : Dec 24, 2019, 10:04 PM IST

नवी दिल्ली- नादारी आणि दिवाळखोरी कायद्यातील (आयबीसी) सुधारणेचा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. हे विधेयक लोकसभेत रखडले होते.


केंद्र सरकारने नादारी आणि दिवाळखोरी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत १२ डिसेंबरला सादर केले होते. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

हेही वाचा-बँकांच्या सकल अनुत्पादक मालमत्तेच्या प्रमाणात सप्टेंबरमध्ये घट - आरबीआय

कॉर्पोरेटमधील नादारी प्रक्रियेतील अडथळे या विधेयकात कमी केले आहेत. तसेच अनेक कंपन्यांच्या प्रवर्तकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. अशा प्रवर्तकाने केलेल्या फौजदारी गुन्ह्याची प्रक्रियेपासून यशस्वी बोली लावणाऱ्यांना संरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या मालमत्ता विकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा-११० कोटींची फसवणूक; मारुतीच्या माजी एमडीविरोधात सीबीआयकडून गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details