न्यूयॉर्क- बोईंग या विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीने १२ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. कोरोना महामारीमुळे उद्योगावर परिणाम झाल्याने कंपनीने कर्मचारी कपात केली आहे.
बोईंग अमेरिकेतील ६ हजार ७७० कर्मचाऱ्यांना कामावरून घरी बसविणार आहे. तर आणखी ५ हजार ५२० कर्मचाऱ्यांना बोईंग स्वेच्छानिवृत्ती देणार आहे. बोईंगने एकूण मनुष्यबळात १० टक्के कपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे एकूण १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. येत्या काही महिन्यात हजारो जणांना कामावरून काढण्यात येणार असल्याचे बोईंगच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.