नवी दिल्ली- भारती एअरटेलला तिसऱ्या तिमाहीत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १ हजार ३५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ८६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
भारती एअरटेल कंपनीला तोटा झाला असला तरी महसूल ८.५ टक्क्यांनी वाढून २१,९४७ कोटी रुपये झाला. तर गेल्या आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये कंपनीने २०,२३१ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. डिसेंबर २०१९ मध्ये दर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उद्योगाच्या आर्थिक सुधारणेसाठी स्वागातार्ह निर्णय आहे. उद्योगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी दर बदलले पाहिजेत, यावर विश्वास असल्याचे भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले.