नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या १० बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला बँक संघटनांनी विरोध केला आहे. बँकांच्या विलिनीकरणाचा निषेध करण्यासाठी सरकारी बँकांचे अधिकारी २६ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.
केंद्र सरकारने ३० ऑगस्टला १० सरकारी बँकांचे चार बँकात विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करत संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनेने दिला आहे.
हेही वाचा-आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्याच्या विधानावरून पियूष गोयल 'ट्रोल'
कर्मचारी संघटनेच्या नेत्याने सांगितले, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. सरकारी बँकांचा संप २५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सप्टेंबर २७ पर्यंत सुरू राहणार असल्याचे एआयबीओसीचे महासचिव दीपक कुमार शर्मा यांनी चंदीगडमध्ये सांगितले.