महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

डिजीटल आर्थिक व्यवहारात बँक ऑफ महाराष्ट्र प्रथम

केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया या उपक्रमासोबत काम करत असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राने म्हटले आहे. समाजाचे डिजीटल सक्षमीकरण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था तयार करणे, हा डिजीटल इंडियाचा हेतू आहे.

Hemant Kumar Tamta & others
बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी पुरस्कार स्वीकारताना

By

Published : Dec 20, 2019, 3:22 PM IST

नवी दिल्ली - बँक ऑफ महाराष्ट्र ही डिजीटल आर्थिक व्यवहारामध्ये सर्व सरकारी बँकांमध्ये प्रथम आली आहे. ही माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जाहीर केलेल्या नोव्हेंबरमधील आकडेवारीतून दिसून आली आहे.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने बँक ऑफ महाराष्ट्राला ग्रामीण स्वविकास प्रशिक्षण संस्था चालविण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी बँक म्हणून पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत कुमार तामता यांनी स्वीकारला आहे.

हेही वाचा-दरवाढ थांबेना; केंद्र सरकार तुर्कीमधून १२.५ हजार टन कांद्याची करणार आयात

केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया या उपक्रमासोबत काम करत असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राने म्हटले आहे. समाजाचे डिजीटल सक्षमीकरण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था तयार करणे, हा डिजीटल इंडियाचा हेतू आहे. देशातील सर्व नागरिकांना डिजीटल व्यवहाराची सुविधा ही सहजपणाने देण्याचे 'व्हिजन' असल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी म्हटले आहे. ही सुविधा परवडणाऱ्या दरात आणि सुरक्षित असेल, असेही राजीव म्हणाले.

हेही वाचा-कॅरीबॅगकरता १४ रुपये आकारणे पडले महागात, डोमिनोजला ५ लाखांचा दंड

ABOUT THE AUTHOR

...view details