महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

होंडापाठोपाठ बजाज ऑटोकडून मोफत सेवेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ - Bajaj Auto free service

ज्या बजाज वाहनांची मोफत सेवा आणि वॉरंटी ही १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत संपत आहे, अशा वाहनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ बजाजच्या सर्व दुचाकी आणि वाणिज्य वाहनांना मिळणार आहे. ब

Bajaj
बजाज

By

Published : May 19, 2021, 4:33 PM IST

मुंबई - बजाज ऑटोने सर्व वाहनांवरील मोफत सेवा आणि वॉरंटी ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने बजाजने हा निर्णय घेतला आहे.

ज्या बजाज वाहनांची मोफत सेवा आणि वॉरंटी ही १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत संपत आहे, अशा सर्व मॉडेलला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ बजाजच्या सर्व दुचाकी आणि वाणिज्य वाहनांना मिळणार आहे. बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले, की गतवर्षीप्रमाणे आम्ही वाहनांच्या सेवेसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा वाहनांची काळजी घेता येईल, याची पुनश्च खात्री देत आहोत. देशातील सर्व डीलरशीपकडून मोफत सेवा आणि वॉरंटीमध्ये मुदतवाढ दिली जाईल, असेही बजाज ऑटोने म्हटले आहे.

हेही वाचा-जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लसही भारतात होणार दाखल

बहुतांश राज्यात लॉकडाऊन-

दरम्यान, महाराष्ट्रात ३० मे रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आवश्यक सेवा वगळता नागरिकांच्या घराबाहेर फिरण्यावर निर्बंध आले आहेत. देशातील बहुतांश राज्यांना कोरोनाच्या उद्रेकात लॉकडाऊन लागू केले आहे.

हेही वाचा-स्पूटनिकचे इतर देशांकरिता उत्पादन घेण्याबाबत डॉ. रेड्डीजची आरडीआयएफबरोबर बोलणी सुरू

नुकतेच होंडा कंपनीनेही मोफत सेवा आणि वॉरंटीमध्ये मुदतवाढ देण्याचे जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details