मुंबई - अॅक्सिस बँकेतील १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ महिन्यात नोकऱ्या सोडल्या आहेत. बँकेने लागणारे मनुष्यबळ लक्षात घेवून २८ हजारहून अधिक जणांना सेवेत घेतले आहे.
बँकिंग क्षेत्रात स्वयंचलित कामाचे (ऑटोमेशन) प्रमाण वाढले आहे. तसेच नव्या कौशल्याची गरज भासत आहे. त्यामुळे बँकेंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. बँकिंग क्षेत्रात नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण २० ते २२ टक्के झाले आहे. अॅक्सिस बँकेने सुमारे ७५ हजार कर्मचाऱ्यांना एकाचवेळी सेवेत घेतले होते. बँकेने एप्रिल ते डिसेंबरदरम्यान १२,८०० कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले आहे. गतवर्षी एप्रिल ते डिसेंबरदरम्यान नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण १७ टक्के होते, असे अॅक्सिस बँकेने म्हटले आहे. हे प्रमाण वाढून चालू वर्षात १९ टक्के झाले आहे.