महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अ‌ॅपल कंपनी स्मार्टफोन वापरणाऱ्याला देणार १,७५० रुपये, कारण...

अ‌ॅपलने २०१७ मध्ये सॉफ्टवेअर अपडेट केल्याने काही आयफोनचे मॉडेलचे काम मंदगतीने झाले आहे. मात्र, स्मार्टफोन अचानक बंद होवू नये व मोबाईलचे आयुष्य वाढविण्यासाठी हे आवश्यक होते असे कंपनीने म्हटले आहे.

Apple
अ‌ॅपल

By

Published : Mar 3, 2020, 3:01 PM IST

सॅन फ्रान्सिस्को- अ‌ॅपलचे काही स्मार्टफोन मंदगतीने काम करत असल्याचे समोर आले आहे. जर आयफोन ६, आयफोन ७ आणि एसई डिव्हाईसेस जर मंदगतीने चालत असेल तर तुम्हाला कंपनी १,७५० रुपये (२५ डॉलर) देणार आहे.

अ‌ॅपलने २०१७ मध्ये सॉफ्टवेअर अपडेट केल्याने काही आयफोनचे मॉडेलचे काम मंदगतीने झाले आहे. मात्र, स्मार्टफोन अचानक बंद होवू नये व मोबाईलचे आयुष्य वाढविण्यासाठी हे आवश्यक होते असे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक ५०० अंशांनी वधारला; हे आहे कारण

ग्राहकांशी योग्यरीत्या संवाद साधला नसल्याबद्दल कंपनीने माफी मागितली आहे. ग्राहकांना कमी किंमतीत बॅटरी बदलून देण्याचे जाहीर केले आहे.

फ्रान्सच्या ग्राहक फसवणूक (फ्रॉड) ग्रुपने अ‌ॅपलवर २५ दशलक्ष युरोचा दंड ठोठावला आहे. अ‌ॅपलची काही उत्पादने काही मंदगतीने चालत असल्याच्या आरोपावरून हा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर अ‌ॅपलने ग्राहकांना सवलतील बॅटरी देण्याचे जाहीर केले आहे. अ‌ॅपलने आयफोनची बॅटरी ७९ डॉलरऐवजी सवलतीत २९ डॉलरने देण्याचे जाहीर केले आहे. आयफोन ६ च्या वापरकर्त्यांना ही बॅटरी सवलतीत मिळणार आहे.

हेही वाचा-कोरोनाने कुक्कुटपालन क्षेत्राचे मोडले कंबरडे; पॅकेजची मागणी

या स्मार्टफोनवर मिळणार रक्कम

आयफोन ६, आयफोन६, ६ प्लस, ६एस प्लस, ७, ७,७प्लस किंवा एसई हे आयओएस १०.२.१ उपकरणे.

ABOUT THE AUTHOR

...view details