नवी दिल्ली - सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या मंत्रिगटाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या मंत्रिगटाचे अध्यक्षपद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे असणार आहे. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना मंत्रिगटातून वगळण्यात आलेले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एअर इंडियाच्या विक्रीकरता स्थापना करण्यात आलेल्या मंत्रिगटामध्ये नवे चार मंत्री असणार आहेत. यामध्ये अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय रेल्वे व वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे.
हे होते मंत्रिगटामध्ये सदस्य-
एअर इंडिया विशेष पर्याय यंत्रणा (एआयएसएएम) असे या मंत्रिगटाचे नाव आहे. या मंत्रिगटाची जून २०१७ मध्ये स्थापना करण्यात आली. या मंत्रिगटामध्ये ५ सदस्य होते. तर मंत्रिगटाचे अध्यक्षपद हे तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे होते. तर केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री अशोक गजपथी राजू, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, उर्जा आणि कोळसा मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मंत्रिगटात होते.