नवी दिल्ली - अॅमेझॉनगुंतवणूक करून देशावर मेहेरेनजर दाखवत नाही, अशीप्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझोस यांनी भारतात १ अब्ज डॉलरची गुंतणूक करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले होते. त्यावर गोयल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बाजारातील किमती प्रभावित कमी करूनही ई-कॉमर्स कंपन्या मोठा तोटा कसा सहन करू शकतात? असा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सवाल केला. पुढे ते म्हणाले, ई-कॉमर्स कंपन्यांनी भारतीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मल्टी ब्रँडच्या किरकोळ प्रकारामधून मागल्या दाराने त्रुटी शोधू नये. भारताने मल्टी ब्रँडच्या किरकोळ विक्रीत ४९ टक्क्यांहून अधिक थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली नाही. तसेच अद्याप कोणत्याही विदेशी कंपनीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.