नवी दिल्ली - देश-विदेशातील उड्डाणे स्थगित केली असताना एअर इंडियाची सेवा पुन्हा सुरू होणार आहे. एअर इंडियाची देशातील विमान सेवा टाळेबंदी संपल्यांनंतर ४ मेपासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे ही १ जूनपासून सुरू होणार आहेत.
जगभरात आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असताना एअर इंडियाने देशातील विमान प्रवासाची तिकिट बुकिंग सेवा ३ मेपर्यंत थांबविली आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची तिकिटे ३१ मे २०२० पर्यंत आरक्षणासाठी स्थगित केल्याचे एअर इंडियाने वेबसाईटवर म्हटले आहे.