महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 19, 2020, 8:04 PM IST

ETV Bharat / business

नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या सल्ल्यानंतर 'महाराजा'कडून बुकिंगला ब्रेक

हरदीप सिंह पुरी यांनीही विमान तिकिट सुरू करण्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एअर इंडियाने तिकिट बुकिंगची सेवा आज बंद केली आहे.

एअर इंडिया
एअर इंडिया

नवी दिल्ली- सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने दुसऱ्याच दिवशी विमान तिकिट बुकिंग बंद केली आहे. सरकारने निर्णय घेतल्यानंतर विमान कंपन्यांनी तिकिट बुकिंगला सुरुवात करावी, असा सल्ला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी दिला होता.

एअर इंडियाने ४ मेपासून देशात तर १ जूनपासून विदेशात विमान सेवा सुरू करणार असल्याचे शनिवारी वेबसाईटवर जाहीर केले होते. त्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कोणतीही विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. हरदीप सिंह पुरी यांनीही विमान तिकिट सुरू करण्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एअर इंडियाने तिकिट बुकिंगची सेवा आज बंद केली आहे.

हेही वाचा-टाळेबंदीचा परिणाम : गोएअरच्या ५,५०० कर्मचाऱ्यांना ३ मेपर्यंत विनावेतन सुट्टी

एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत देश-विदेशातील विमान उड्डाणांचे बुकिंग स्थगित करण्याचा निर्णय टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात ३ एप्रिलला घेतला होता. दरम्यान, खासगी विमान कंपन्या ४ मेपासून तिकिट बुकिंग करत आहेत.

हेही वाचा-आरोग्य विम्याचे दावे दोन तासात निकाली काढा - आयआरडीएआयचे कंपन्यांना आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details