नवी दिल्ली - उन्हाळ्यात ग्राहकांकडून एसीची मागणी वाढत असते. त्यापूर्वीच एसीच्या किमती ५ टक्क्यापर्यंत वाढणार आहेत. एसीच्या उत्पादनासाठी लागणारे कॉम्प्रेसरवरील वाढलेले सीमाशुल्क आणि चीनमधील कोरोनामुळे कंपन्यांचा लॉजिस्टिकचा खर्च वाढला आहे. त्यामुळे एसीच्या किमती वाढणार आहेत.
कोरोनामुळे वर्ष २०२० अनेक कंपन्यांना आव्हानात्मक वर्ष वाटत आहे. एसीचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना कॉम्प्रेसर, कंट्रोलर असे सुट्टे भाग थायलंड, मलेशिया आणि चीनमधून विमानातून आणावी लागत आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनाचा खर्च वाढत आहे.
हेही वाचा-ट्रम्प यांचा भारत दौरा केवळ व्यापारच नव्हे तर रणनीतीसाठीही महत्त्वाचा
एप्रिल-जून हा एसी कंपन्यांसाठी व्यवसायाचा हंगाम आहे. अशावेळी आलेले संकट दुर्दैवी असल्याची भावना एसी उत्पादक करत आहेत. सीमा शुल्क आणि कोरोनामुळे चीनमधून आयात होणाऱ्या कॉम्प्रेसरच्या पुरवठ्यात अडथळे आल्याचे ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थैयागराजन यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनाने जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुधारणेला धोका- आयएमफ
ब्ल्यू स्टार कंपनीने यापूर्वीच एसीच्या किमती ३ ते ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. डायकिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक के. जे. जावा यांनी बहुतेक उत्पादक थायलंड आणि मलेशियामधून आयात करत असल्याचे सांगितले. कंपनी मार्चपासून एसीच्या किमती वाढविणार आहेत. जर परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा किमतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.