महाराष्ट्र

maharashtra

'Jawa ४२' नव्या फिचर्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

By

Published : Feb 23, 2021, 7:33 PM IST

Updated : Feb 25, 2021, 2:29 PM IST

दुचाकीची निर्मिती करणारी कंपनी जावाने भारतात २०२१ जावा ४२ अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. बाईक लव्हर्ससाठी कंपनीने या मॉडेलमध्ये अनेक आकर्षक फिचर्स दिले आहेत. यासह कंपनीने बाईकमध्ये ३ कलर्स ऑप्शन दिले आहेत.

bike news, 2021 Jawa Forty Two launched, Jawa Forty Two price, jawa forty two price, New Jawa Forty Two Design, New Jawa Forty Two Engine and chassis, Jawa 42 version 2.1 launched, Jawa 42 version 2.1, jawa 42 new variant, Jawa 42 Price BS6, जावा २.१ अपडेटेड फीचर्स, जावा ४२ नवीन व्हेरियंट, Jawa 42 भारतात लाँच, 2021 Jawa 42 भारतात लाँच, 2021 Jawa Forty Two launched in india
Jawa 42 नव्या फिचर्ससह भारतात लाँच

ऑटो डेस्क - दुचाकी गाड्यांची निर्मिती करणारी कंपनी "जावा" ने 'Jawa ४२' चा २०२१ मॉडल लाँच केला आहे. बाईकच्या नव्या अवतारात कंपनीने तांत्रिकदृष्ट्या काही फिचर्स अपडेट केले आहेत. नवीन आकर्षक रंग आणि लूकमुळे बाईक लव्हर्स याला चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीने सांगितले, की १२ फेब्रुवारीपासून बाईक सर्व डिलरशीपवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

संपादित छायाचित्र

उल्लेखनीय म्हणजे जावा कंपनीने केवळ या बाईकमध्येच नाही तर स्वत:चा लाइन-अपमधील अन्य २ बाईक Jawa आणि Perak २०२१ च्या मॉडेलमध्ये ही अद्ययावत बदल केले आहेत. याप्रसंगी क्लासिक लेजेंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, की गेल्यावर्षी सर्वांनी जावा बीएस-६ एडिशन बघितला होता. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आम्ही बाईकचा परफार्मन्स् आणि बाईक रायडर्सचा अनुभव आणखीन चांगला बनवण्यासाठी याला २.१ व्हर्जनमध्ये अपडेट केले आहे.

सौजन्य - www.jawamotorcycles.com

कंपनीने नवीन 'JAWA ४२' चा लूक पूर्वीपेक्षा आणखीन आकर्षक आणि स्टायलिश बनवला आहे. बाईकच्या सीटचा आकार तुलनेत मोठा असून फाइन ट्यूंड क्रॉस पोर्ट इंजिन पंचसाठी देण्यात आले आहेत. क्लासिक लेजेंडचे सीईओ यांनी पुढे बोलताना सांगितले, की बाईकमध्ये ३ कलर ऑप्शन्स् देण्यात आले आहेत. यामध्ये ओरियन रेड, सीरियस व्हाईट, ऑलस्टार ब्लॅक या कलर्सचा समावेश आहे.

सौजन्य - www.jawamotorcycles.com

'JAWA Forty Two' च्या या रेंजमध्ये फ्लायस्क्रीन आणि अपडेटेड हेडलॅम्प ग्रिल पहायला मिळणार आहे. अलॉय व्हिल्ससह ट्यूबलेस टायरदेखील या बाईकमध्ये असणार आहे. यासह ग्राहकांना त्यांना आवडणारे अ‍ॅक्सेसरीज खरेदी करण्याचा पर्याय कंपनीने उपलब्ध करुन दिला आहे.

सौजन्य - www.jawamotorcycles.com
Last Updated : Feb 25, 2021, 2:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details