नवी दिल्ली - कोरोनाच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची बातमी आहे. अहमदाबादमधील झायडस कॅडिला कंपनीच्या झायकोव्ह-डी या कोरोना लशीला तज्ज्ञांच्या समितीकडून आपत्कालीन वापरासाठी आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात कोरोना लशींबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेच्या शून्य प्रहरात माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, की ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये देशातील चार भारतीय कंपन्यांना स्वदेशी कोरोना लशींचे उत्पादन करणार आहेत. हे लस उत्पादन देशातील मागणीची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बायॉलॉजिकल ई आणि नोव्हार्टिस लस ही येत्या काही दिवसांमध्ये बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-आरक्षणाबाबतच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधक पाठिंबा देणार - मल्लिकार्जुन खरगे
झायडस कॅडिलाच्या लशींचे तीन डोस नागरिकांना घ्यावे लागतात. कंपनीने आपत्कालीन वापरासासाठी मंजुरी मिळण्याकरिता भारतीय औषधी नियंत्रकाकडे अर्ज केल्याचे कंपनीने यापूर्वीच म्हटले आहे. कंपनीने दरवर्षी 10 ते 12 कोटी लशींचे उत्पादन करण्याचे नियोजन केले आहे. झायडसने 50हून अधिक देशांमध्ये कोरोना लशींच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या आहेत.