ओरिसा- येस बँकेने कामकाज पूर्ववत सुरू होताच दुसऱ्या दिवशी मोठे पाऊल उचलले आहे. बँकेने व्याजासह जगन्नाथ मंदिराला ३९७ कोटी रुपयांचा कॉर्पस फंड दिला आहे.
येस बँकेने कॉर्पस फंड हा पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या स्टेट बँकेच्या खात्यावर जमा केला आहे. येस बँकेने जगन्नाथ मंदिराचे मुख्य प्रशासक कृष्णन कुमार यांना पत्र लिहून कॉपर्स फंड दिल्याचे कळविले आहे.
दरम्यान, येस बँकेवरील तात्पुरते निर्बंध भारतीय रिझर्व्ह बँकने १८ मार्चला काढले आहेत. तर येस बँकेत खासगी बँकांसह स्टेट बँक ऑफ इंडियाने गुंतवणूक केली आहे.