नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांपासून सातत्याने निराशाजनक कामगिरी नोंदवत असलेल्या याहूकडून 'याहू' ग्रुप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 15 डिसेंबरचा दिवस निवडण्यात आला आहे. 2017 मध्ये याहू विकत घेतलेल्या वेरिझनने मंगळवारी आपला निर्णय जाहीर केला. याहू ही वेबर मधल्या काळातील सर्वात मोठी मेसेज बोर्ड सिस्टम राहिली आहे. मात्र, आता या वर्षाच्या शेवटी याहूचा प्रवास संपवणार आहे.
कंपनीने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे की, “याहू ग्रुप्सच्या वापरात गेल्या अनेक वर्षांपासून निरंतर घट होत आहे. सध्याच्या काळात ग्राहकांना प्रीमियम आणि विश्वासार्ह सामग्री हवी आहे, हे आम्ही पाहत आहोत. असे निर्णय घेणे कधीच सोपे नसते. परंतु, आमच्या दीर्घकालीन रणनीतीमध्ये योग्य असलेल्या उत्पादनांबद्दल आम्हाला कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आता आम्ही व्यवसायाच्या इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करू.