महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मोबाईल आणि इंटरनेट नसले तरी तुम्हाला मिळविता येणार व्हॉट्सअॅपचे अपडेट ? - डिव्हाईस

वॅबइटालइन्फोने फेसबुक ही युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म (यूडब्ल्यूपी) विकसित करत असल्याचे ट्विट केले आहे.

प्रतिकात्मक

By

Published : Jul 28, 2019, 7:11 PM IST

नवी दिल्ली - मोबाईल आणि इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅपचा वापर करणे, याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. पण आता व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुक वापरकर्त्यांना खास फीचर देणार आहे. त्यामध्ये डेस्कटॉपवर चालणारे व्हॉट्सअॅप हे फोनला न जोडता इंटरनेटशिवाय सुरू राहणार आहे.

व्हॉट्सअॅपने २०१५ मध्ये वेब व्हर्जन सुरू केले. ते मोबाईल अॅपसारखे काम करते. मात्र त्यासाठी फोनचे इंटरनेट जोडणे आवश्यक आहे. वॅबइटालइन्फोने फेसबुक ही युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म (यूडब्ल्यूपी) विकसित करत असल्याचे ट्विट केले आहे. या तंत्रज्ञानामुळे फोन बंद असला तरी व्हॉट्सअॅपला विविध माध्यमे जोडणे शक्य होणार आहेत. याशिवाय एकाच व्हॉट्सअॅप अकाउंटचा विविध साधनांवर (डिव्हाईस) वापर करण्यावर फेसबुक कंपनी काम करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details