नवी दिल्ली - टाळेबंदीच्या काळात व्हिडिओ कॉलिंगचे मागणी वाढत असल्याने व्हॉट्सअॅपने ४ जणांवरून ९ जणांना व्हिडिओ कॉलिंगची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे झुम या चिनी अॅपबरोबर व्हॉट्सअॅप स्पर्धा करू शकणार आहे.
व्हॉट्सअॅपची ग्रुप कॉलिंग सुविधा ही आयओएस आणि अँड्राईड बिटाच्या वापरकर्त्यांना आहे. त्यासाठी वापरकर्त्याला २.२०.५०.२५ आयओएस बिटा टेस्टफ्लाईटवरून अपडेट करावे लागणार आहे. तर २.२०.१३३ बिटा हे गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट करावे लागणार आहे.