महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सावधान ! व्हॉट्सअॅप अपडेट करा, अन्यथा होवू शकतो स्पायवेअर हल्ला.. - facebook

इस्राईलची एनएसओ ग्रुप ही कंपनी इस्राईल सरकारला तपासकामात मदत करते. त्यासाठी कंपनीकडून वेगवेगळ्या साधनांचा वापर करण्यात येतो. या कंपनीचे नाव न घेता व्हॉट्सअॅप कंपनीने या प्रकाराबाबत पुष्टी दिली आहे.

व्हॉट्सअॅप

By

Published : May 14, 2019, 4:15 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - व्हॉट्सअॅपने १५० कोटी वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप अपडेट करण्याची विनंती केली आहे. व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुक कंपनीला एक स्पायवेअर आढळून आला आहे. जेव्हा वापरकर्ता व्हाईस कॉल करतो, तेव्हा फोनमध्ये स्पायवेअर इन्स्टॉल होत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपमधून मोबाईलमधील स्पायवेअर इस्त्राईलच्या सायबर इंटेलिजिन्स कंपनी एनएसओ ग्रुपने तयार केल्याचे माध्यमांनी वृत्त दिले आहे.

काय आहे व्हॉट्सअॅपचे म्हणणे-
वापरकर्त्याने व्हाईस कॉल केला असता संपर्क झाला नाही तर व्हायरस मोबाईलमध्ये येतो. गेल्या महिन्यात हा धोका टळण्यासाठी उपाययोजना करण्यात आली होती, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. सध्या व्हॉट्सअॅपचे असलेले व्हर्जन अद्यावत करावे, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. तसेच मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीमही अद्यावत करण्याची सूचनाही व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना केली आहे. फार कमी वापरकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपमधून व्हायरस हल्ला करण्यात आला होता, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. सुरक्षा व्यवस्थेमधील ही सर्वात मोठी कमतरता आहे.


इस्राईलची कंपनी एनएसओ ग्रुप करते हेरगिरीचे काम-
इस्राईलची कंपनी एनएसओ ग्रुप ही इस्राईल सरकारला तपासकामात मदत करते. त्यासाठी कंपनीकडून वेगवेगळ्या साधनांचा वापर करण्यात येतो. या कंपनीचे नाव न घेता व्हॉट्सअॅप कंपनीने या प्रकाराबाबत पुष्टी दिली आहे. याबाबतचा आरोप मात्र एनएसओ ग्रुपने फेटाळून लावला आहे. एखादी संस्था अथवा व्यक्तीविरोधात तंत्रज्ञानाचा आपण वापर करणार नाही अथवा करू शकत नाही, असे एनएसओने म्हटले आहे. एनएसओ हे पिगासुस नावाच्या स्पायवेअरची विविध सरकारी तपास संस्थांना विक्री करते. या सॉफ्टवेअरमधून एखाद्या ठराविक साधनामधील अतिसंवेदनशील डाटा गोळा करणे शक्य होते.

जर खिडकी उघडी असेल तर ती बंद करणे कठीण जाते, अशी टिप्पणी एका टेक माध्यमाने व्हॉट्सअॅपवरील सायबर हल्ल्यावर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details