महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ट्विटरकडून कोरोनाच्या संकटात दानशूरपणा; ३ एनजीओला १५ दशलक्ष डॉलरची मदत - Sewa International USA

ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्से यांनी सोमवारी ट्विट करत तीन एनजीओंना मदत केल्याचे जाहीर केले. केअर, एअर इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल युएसए या तीन एनजीओंची नावे आहेत.

ट्विटर
ट्विटर

By

Published : May 11, 2021, 3:22 PM IST

वॉशिंग्टन -भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना ट्विटरने मदतीचा हात दिला आहे. मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटरने भारतामधील तीन एनजीओला कोरोनाच्या संकटात १५ दशलक्ष डॉलरची मदत केली आहे.

ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्से यांनी सोमवारी ट्विट करत तीन एनजीओंना मदत केल्याचे जाहीर केले. केअर, एअर इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल युएसए या तीन एनजीओंची नावे आहेत. ट्विटरचे सीईओ यांनी एड इंडियाला १० दशलक्ष डॉलर तर सेवा इंटरनॅशनल आणि एड इंडियाला २.५ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा-मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी; कोविडच्या नियमांचे उल्लंघन

सेवा इंटरनॅशनल जास्तीत जास्त काम करण्यासाठी प्रयत्न करणार-

सेवा इंटरनॅशनल मिळणाऱ्या निधीचा वापर करून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, व्हेटिंलटर आदींचा समावेश आहे. या एनजीओकडून खरेदी करण्यात येणारी उपकरणे ही सरकारी रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरसह रुग्णालयात वितरित करण्यात येणार आहेत. सेवा इंटरनॅशलनचे उपाध्यक्ष संदीप खडकेकर यांनी सेवाभावी कार्यासाठी मदत केल्याबद्दल डोर्से यांचे आभार मानले आहेत. मदतीपैकी ९५ टक्के रक्कम ही प्रत्यक्षात उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाते. जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न असल्याचेही संदीप खडकेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, केअर ही संस्था गरिबींचे उच्चाटन करण्यासाठी काम करणारी संस्था आहे.

हेही वाचा-'टॉमी'ला 'कुत्रा' म्हणणं पडलं महागात; दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी.. व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details