महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सेट टॉप बॉक्स न बदलता आता डीटीएच सेवेचा घ्या आनंद - ट्राय

सेट टॉप्स बॉक्सच्या सेवेतील अनेक अडथळे दूर करण्यात आले आहेत. तरीही काही मुलभूत आव्हाने असल्याचे शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, की आधारची यंत्रणा ही  बायोमेट्रिक वगळता पूर्णपणे ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर विकसित करण्यात आली आहे.

दूरसंचार नियामक प्राधिकरण

By

Published : Mar 27, 2019, 4:24 PM IST

नवी दिल्ली - सेट टॉप बॉक्स नसतानाही प्रेक्षकांना डीटीएचसह केबल प्रसारण सेवेचा आनंद घेता येणार आहे. ही सेवा वर्षअखेर सुरू होणार असल्याचे ट्रायचे चेअरमन आर.एस. शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सेट टॉप्स बॉक्सच्या सेवेतील अनेक अडथळे दूर करण्यात आले आहेत. तरीही काही मुलभूत आव्हाने असल्याचे शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, की आधारची यंत्रणा ही बायोमेट्रिक वगळता पूर्णपणे ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर विकसित करण्यात आली आहे.

इंडियन सेल्युलर आणि ईलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए) आणि सल्लागार संस्था केपीएमजीने ओपन इकोसिस्टिमच्या उपकरणावर अभ्यास अहवाल तयार केला आहे. यामध्ये ८९ टक्के मोबाईल फोन हे ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टिमवर चालत असल्याचे म्हटले आहे.

अनेक अॅप आणि सेवांसाठी स्मार्टफोनची आवश्यकता आहे. ओपन ओएसमुळे स्मार्टफोनला बहुभाषीय क्षमतांमधून वापरता येते. याचा कौशल्य विकास कार्यक्रमालाही फायदा झाल्याचे आयसीईएचे चेअरमन पंकज मोहिंद्रू यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details