महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा: अमेरिका-भारतामध्ये तीन सामंजस्य करार - डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अमेरिका-भारतामधील भागीदारीच्या दृष्टीने प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये संरक्षण, सुरक्षा, उर्जा सामरिक भागीदारी, व्यापार व लोकांमधील दृढसंबंध यांचा समावेश आहे.

By

Published : Feb 25, 2020, 4:40 PM IST

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत भेटीवर आले आहेत. या भेटीदरम्यान भारत-अमेरिकेदरम्यान तीन सामंजस्य करार करार करण्यात आले आहेत. तसेच मोठा व्यापार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अमेरिका-भारतामधील भागीदारीच्या दृष्टीने प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये संरक्षण, सुरक्षा, उर्जा सामरिक भागीदारी, व्यापार व लोकांमधील दृढसंबंध यांचा समावेश आहे. अमेरिका आणि भारतामध्ये संरक्षण करार करणे हे दोन्ही देशांमधील भागीदारी बळकट करण्याचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले आहे.

हे निर्णय घेण्यात आले आहेत-

  • भारताने अमेरिकेबरोबर उर्जा क्षेत्रासाठी सामंजस्य करार केला आहे. दोन्ही देशांमधील संबंध जागतिक पातळीवर नेण्याचे अमेरिका-भारताने ठरविल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
  • दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य हे सामरिक भागीदारी वाढत असल्याचे सूचित होत आहे. अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी नवी यंत्रणा करण्यासाठी आम्ही सहमत झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
  • ५ वायरलेस नेटवर्क आणि स्वातंत्र्याचे साधन होवू शकणारे विकसित होणारे तंत्रज्ञान, समृद्धी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. शाश्वत प्रकल्पांसाठी ब्ल्यू डॉट नेटवर्कवर काम करत असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यांनी सांगितले. केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी व्यापाराबाबत सकारात्मक चर्चा केल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

हेही वाचा-भारतीय उद्योगांनी अमेरिकेत विस्तार करावा; डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा

व्यापार बोलणीला कायदेशीर स्वरूप देण्याचा दोन्ही गटांनी निर्णय घेतला आहे. मोठा व्यापार करार करण्यासाठी तडजोडी करण्यासाठी तयारी करण्याचीही दर्शविली आहे. व्यापक व्यापार करार करण्यासाठी आमच्या गटाने मोठी प्रगती केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. दोन्ही देश मोठ्या करारापर्यंत पोहोचतील, यासाठी आशावादी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details