नवी दिल्ली- टिकटॉकसह हॅलोची मालकी असलेल्या चिनी कंपनी बाईटडान्सने देशातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अॅपवरील बंदी कायम ठेवल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
टिकटॉकचे हंगामी जागतिक प्रमुख व्हॅनेसा पापस आणि उपाध्यक्ष ब्लॅक चँडली यांनी संयुक्तपणे कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठविला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत असल्याचे म्हटले आहे. त्याचा देशातील सर्व कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे टिकटॉकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भविष्यात भारतामध्ये येण्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे. मात्र, वेळ आल्यावर भारतात परत येऊ, अशी त्यांनी आशाही व्यक्त केली आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्प: ई-कॉमर्स उद्योगांकरता सरकार तरतूद करणार