वॉशिंग्टन -टिकटॉकने अमेरिकेतील व्यवसायाचा हिस्सा मायक्रोसॉफ्टला देण्यास नकार दिला आहे. ओरॅकल या कंपनीबरोबर हिस्सा विक्री करण्यासाठी बोलणी सुरू केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी अधिकारांचा वापर करून टिकटॉकवर बंदी आणली आहे. टिकटॉकची मालकी असलेली बाईटडान्सकडून अमेरिकेतील वापरकर्त्यांचा डाटा चीनमध्ये पाठविला जात असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने टिकटॉकची खरेदी करण्यासाठी बाईटडान्सबरोबर बोलणी सुरू केली. मात्र, टिकटॉकने हा सौदा फेटाळल्याचे मायक्रोसॉफ्टने रविवारी जाहीर केले आहे.
हेही वाचा-रिल्सच्या लाँचिंगनंतर झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत वाढ; 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये समावेश
देशाची सुरक्षितता लक्षात घेता आमचा प्रस्ताव टिकटॉकच्या वापरकर्त्यांसाठी चांगला होता. उच्च दर्जाची सुरक्षितता, गोपनीयता, ऑनलाइन सुरक्षा आणि चुकीच्या माहितीविरोधात लढण्यासाठी सेवेत लक्षणीय बदल करण्यात येणार होते, असे मायक्रॉसॉफ्टने म्हटले आहे.
हेही वाचा-ट्रम्प यांचा नवा आदेश.. 90 दिवसांत अमेरिकेतून टिक-टॉकची गुंतवणूक काढून घ्या
टिकटॉक ही देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, ट्रम्प यांचे सर्व आरोप टिकटॉकने फेटाळले होते. वॉलमार्टनेही टिकटॉकमध्ये खरेदी करण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. तर ओरॅकल कंपनीसह टिकटॉकने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
तर, यापूर्वीच भारताने टिकटॉकवर देशात बंदी लागू केली आहे.