महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाचा वाढता संसर्ग; सीरमकडून इतर देशांना लस मिळण्यास होणार उशीर - COVAX

कोव्हॅक्सचे २८ दशलक्ष डोस पुरविण्यात आले आहेत. तर कोव्हिशिल्डचे अतिरिक्त ४० दशलक्ष डोस हे मार्चपर्यंत उपलब्ध होणार आहेत. तर ५० दशलक्ष डोस हे एप्रिलमध्ये उपलब्ध होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हॅक्स ही भारतामध्ये वितरित करण्यास प्राधान्य देण्यासाठी वचनबद्धता दाखविली आहे.

Serum Institute of India
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम

By

Published : Mar 29, 2021, 5:07 PM IST

हैदराबाद -देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याचा फटका इतर देशांना बसणार आहे. भारतामधून इतर देशांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध होण्यास उशीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोव्हॅक्सचे २८ दशलक्ष डोस पुरविण्यात आले आहेत. तर कोव्हिशिल्डचे अतिरिक्त ४० दशलक्ष डोस हे मार्चपर्यंत उपलब्ध होणार आहेत. तर ५० दशलक्ष डोस हे एप्रिलमध्ये उपलब्ध होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हॅक्स ही भारतामध्ये वितरित करण्यास प्राधान्य देण्यासाठी वचनबद्धता दाखविली आहे.

हेही वाचा-आरबीआयचे पतधोरण 7 एप्रिलला होणार जाहीर; रेपो दर 'जैसे थे' राहण्याची शक्यता

जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्सफोर्डची अॅस्ट्राझेनका ही लस वितरित करण्यासाठी कृती कार्यक्रम देण्याच्या सूचना केल्या आहेत. या कृति कार्यक्रमामधून अॅस्ट्राझेनका लस समान वितरित होईल, अशी जागतिक आरोग्य संघटनेला अपेक्षा आहे.

हेही वाचा-स्पॉटिफायचे मोबाईल अॅपवरील फिचर डेस्कटॉपवरही अनुभवता येणार!

लशीच्या उत्पादकांना लशीच्या उत्पादनासाठी अधिक वेळ हवा आहे. अशा परिस्थितीत अॅस्ट्राझेनका ही विविध उपखंडामध्ये नवीन पुरवठा साखळी वापरू शकते. अॅस्ट्राझेनका ही येत्या आठवड्यांमध्ये 82 देशांना कोव्हॅक्स पुरविण्यात येणार असल्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये कोव्हॅक्सचे डोस पुरविण्याचे कंपनीचे ध्येय आहे. यापूर्वीच कोव्हॅक्स ही 50 हून अधिक देशांमध्ये वितरित करण्यात आली आहे.

हेही वाचा-कोव्हॅक्सच्या चाचणीची भारतात सुरुवात; सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता

अमेरिकेची लस कंपनी नोवॅवॅक्स कंपनीने सीरमबरोबर एनव्हीएक-कोव्ह२३७३ या कोरोना लशीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला आहे. ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या भारतासह इतर देशांमध्ये वापरण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details