मुंबई - सोमवारी शेअर बाजार उघडतानाच 'रेड मार्क'वर उघडला. सकाळी सेन्सेक्सची सुरुवात साधारणपणे ५०० ते ६०० अंशांनी कोसळून ३०,५४१ अंशांवर स्थिरावला होता. तर, निफ्टीही १६५ अंशांनी कोसळून ८,९४२ अंशांवर स्थिरावला होता.
मोठमोठ्या कंपन्यांचेही नुकसान..

हीरो मोटोकॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक अशा मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही आज रेड मार्कवर उघडले. तर भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, वेदांता लिमिटेड, मारुती, एनटीपीसी अशा कंपन्यांचे शेअर्स ग्रीन मार्कवर उघडले.
आज धातू आणि औषध बाजार वगळता इतर सर्व विभागांतील बाजार रेड मार्कवर उघडला. यामध्ये एफएमजीसी, मीडिया, बँक, खासगी बँक, ऑटो, आयटी आणि पीएसयू बँकेचाही समावेश आहे.
हेही वाचा :कोरोनामुळे जागतिक व्यापारामध्ये एक तृतीयांशांपर्यंत घट होण्याची भीती : डब्ल्यूटीओ