महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार खुला होताना ३५० अंशांची घसरण, 'या' कंपन्यांचे घसरले शेअर

विप्रो कंपनीची तिमाहीमधील कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याने शेअर बाजार खुला होताना निर्देशांक घसरल्याचे ट्रेडर्सने सांगितले. मार्चच्या तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफा सहा टक्क्यांनी घसरला आहे.

शेअर बाजार
शेअर बाजार

By

Published : Apr 16, 2020, 10:52 AM IST

मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ३५० अंशांनी घसरला आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि अर्थव्यवस्थेवर होणारा वाईट परिणाम या कारणांनी गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

मुंबई शेअर बाजार ३५८.६१ अंशांनी घसरून ३०,०२१.२० वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ८४.५० अंशांनी घसरून ८,८४०.८० वर पोहोचला. इन्फोसिसचे शेअर सर्वाधिक ४ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. त्यापाठोपाठ कोटक बँक, हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, टायटन आणि अॅक्सिस बँकेचे शेअर घसरले आहेत. तर एल अँड टी, पॉवरग्रीड, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.

हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये प्रवासी रेल्वे बंद असूनही सरकारने असे कमविले ७.५ कोटी

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ३१०.२१ अंशांनी घसरून ३०,३७९.८१ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ६८.५५ अंशांनी घसरून ८,९२५.३० वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआयएस) सुमारे १,३५८.६६ कोटी रुपयांच्या शेअरची मागील सत्रात खरेदी केली होती.

हेही वाचा-एफएमसीजी कंपन्यांना भेडसावतेय मनुष्यबळाची कमतरता

ABOUT THE AUTHOR

...view details