नवी दिल्ली- पीएमसी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या अएचडीआयएलच्या प्रवर्तकांना दिलासा देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एचडीआयएलच्या प्रवर्तकांना ऑर्थर कारागृहातून घरी स्थानबद्ध करण्याची परवानगी दिली होती.
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्यात एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायाधीश बी. आर. गवई आणि सुर्यकांत यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांची बाजू ऐकून घेतली. महाधिवक्ता मेहता यांनी वाधवान पिता-पुत्राला कारागृहातून घरी नेण्याच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी केली. प्रवर्तकांची संपत्ती विकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे कामकाज सुरू राहावे, अशी मेहता यांनी न्यायालयाला विनंती केली. या विनंतीला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
हेही वाचा-'पीएमसी'चे पुनरुज्जीवन; शरद पवारांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट