नवी दिल्ली - अनेकदा ग्राहकांचे कार्ड वापरून एटीएममधून पैसे काढण्याचे गैरप्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नवा बदल केला आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना मोबाईलवरील ओटीपी द्यावा लागणार आहे.
एसबीआयच्या एटीएममधून १० हजार रुपयांहून अधिक पैसे काढताना ग्राहकांना ओटीपी देणे बंधनकारक असणार आहे. हा ओटीपी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पैसे काढतानाच द्यावा लागणार आहे. हा बदल १ जानेवारी २०२० पासून होणार आहे. त्यामुळे एटीएममधून बेकायदेशीररित्या पैसे काढण्याचे प्रकार टळू शकणार आहेत.