मुंबई- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व मुदत ठेवींवर व्याजदरात कपात केली आहे. कमी मुदत असलेल्या ठेवींवरील व्याजदरात ४० बेसिस पाँईटने कपात करण्यात आली आहे.
स्टेट बँकेने मे महिन्यात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. यापूर्वी स्टेट बँकेने १२ मे रोजी व्याजदरात कपात केली होती. स्टेट बँकेचे नवे व्याजदर हे बुधवारपासून लागू होणार आहेत. नवे व्याजदर हे नव्या ठेवी आणि ठेवींचे नूतनीकरण करताना लागू होणार आहेत.
हेही वाचा-मास्क हीच तुमची नवी ओळख; गुजरातच्या फोटोग्राफने 'असा' शोधून काढला जुगाड
असे असणार ठेवींचे नवे व्याजदर
- ठेव जर ४५ दिवसांसाठी असेल तर २.९० टक्के व्याजदर मिळणार आहे. यापूर्वी ३.३० टक्के व्याजदर होता.
- १८० ते २१० दिवसांसाठी ४.४० टक्के व्याजदर असणार आहे. यापूर्वी ४.८० टक्के व्याजदर होता.
- एक वर्ष ते दोन वर्षांच्या मुदतठेवीवर ५.१० टक्के व्याजदर असणार आहे. यापूर्वी ५.५० टक्के व्याजदर होता.
- जर ठेव पाच वर्षे ते १० वर्षांची असेल तर ५.४० टक्के व्याजदर लागू होणार आहे. यापूर्वी ५.७० टक्के व्याजदर होता.
- वरिष्ठ नागरिकांनाही मिळणाऱ्या व्याजदरातही ४० बेसिस पाँईटने कपात होणार आहे.
- बँकेने मोठ्या ठेवींवरील व्याजदरातही कपात केली आहे. ठेव जर २ कोटी किंवा त्याहून अधिक असेल तर त्यावरील व्याजदरात ५० बेसिस पाँईटने कपात केली आहे.
स्टेट बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सध्याच्या परिस्थितीत व्याजदर कमी करावे लागणार असल्याचे म्हटले होते. व्याजदरातील कपात ही कर्जदार आणि ठेवीदारांसाठी असेल, असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा-कोरोनावरील पंतजलीचे आयुर्वेदिक औषध चाचणीपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात