मुंबई- घराचे स्वप्न साकार होण्यासाठी अनेकांना किचकट नियमांना तोंड द्यावे लागते. यापैकीच एक अट असलेली कर्जाची मर्यादा आता काहीशी शिथिल होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या गृहकर्जाची मर्यादा वाढवावी, असे निर्देश आरबीआयने खासगी बँकांना दिले आहेत.
गृहकर्जाची मर्यादा वाढवा; आरबीआयचे बँकांना निर्देश - आरबीआय
महानगरामधील कर्जास पात्र असलेल्यांसाठी कर्जाची मर्यादा ही ३५ लाखापर्यंत करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.
प्रतिकात्मक
महानगरामधील कर्जास पात्र असलेले कर्जाची मर्यादा ही ३५ लाखापर्यंत करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. तर महानगरा व्यतिरिक्त इतर ठिकाणी कर्जाची मर्यादा ही २५ लाखापर्यंत करण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. हे निर्देश बँकाकडून प्राधान्यक्रमाने कर्ज दिले जात असलेल्या क्षेत्रासाठीच आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना खूश करणारा निर्णय घेतला आहे.