महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अदानी ग्रुपच्या तिन्ही कंपन्यांची खाती गोठविल्याचे रिपोर्ट दिशाभूल करणारे- गौतम अदानी - APMS Investment fund

अदानी एन्टरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनिमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी पावर आणि अदानी टोटल गॅसने शेअर बाजाराला माहिती दिली आहे. या माहितीत तिन्ही कंपन्यांची खाती गोठविण्याचे रिपोर्ट हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

गौतम अदानी
गौतम अदानी

By

Published : Jun 14, 2021, 7:00 PM IST

नवी दिल्ली- अब्जाधीश गौतम अदानी यांनी तिन्ही कंपन्यांचे खाती गोठविल्याचे वृत्त फेटाळले आहे. खाती गोठविल्याचे रिपोर्ट स्पष्टपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचा दावा केला आहे. एनएसडीएलने अदानी ग्रुपच्या मालकीच्या तीन कंपन्यांची खाती गोठविल्याचे रिपोर्ट आले होते. त्या वृत्तानंतर अदानी ग्रुपच्या शेअरला आज मोठा फटका बसला आहे.

अदानी एन्टरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनिमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी पावर आणि अदानी टोटल गॅसने शेअर बाजाराला माहिती दिली आहे. या माहितीत तिन्ही कंपन्यांची खाती गोठविण्याचे रिपोर्ट हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. चुकीच्या रिपोर्टमुळे गुंतवणुकदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आणि ग्रुपच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचे कंपन्यांनी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. एनएसडीएल वेबसाईटमध्ये अदानी ग्रुपच्या अलबुला इनव्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हसेटमेंट फंडची खाती गोठविल्याचे दाखविली आहेत. मात्र, त्यामागे कारण दाखविलेले नाही.

संबंधित बातमी वाचा-Adani Lost 55k Cr, अदानींचे एका दिवसात 55 हजार कोटींचे नुकसान, असा बसला फटका

अदानी ग्रुपचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान

अदानी समूहसाठी आज शेअर बाजारात काळा दिवस ठरला. अदानी उद्योग बर्‍याच कंपन्यांमध्ये आज लोअर सर्किट लागले आहे. शेअर बाजारामध्ये व्यापार सुरू होताच अदानी एंटरप्राईजेसचे शेअर 10 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे लोअर सर्किटला फटका बसला. यानंतर, अदानी ग्रीनमध्ये लोअर सर्किटदेखील बसविण्यात आले. पहिल्या एक तासाच्या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे अदानीची संपत्ती 7.6 अब्ज डॉलर किंवा 55 हजार कोटी रुपयांनी खाली आली आहे.

हेही वाचा-राम मंदिर ट्रस्टच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावे - संजय राऊत

या कारणाने गोठविली खाती-

एनएसडीएलच्या वेबसाइटनुसार, ही अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांची खाती 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी गोठविली होती. या कंपनीचा अदानी एंटरप्रायजेसमध्ये 6.82 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के हिस्सा आहे. कस्टोडियन बँका आणि परदेशी गुंतवणूकदार हाताळणार्‍या कायदा संस्थांच्या म्हणण्यानुसार या विदेशी फंडांमध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांची खाती गोठविली आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) लाभार्थी मालकीची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details