महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 27, 2020, 6:04 PM IST

ETV Bharat / business

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी सरकारने घेतली ई-कॉमर्स कंपन्यांची बैठक

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स उद्योगांच्या भागीदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी चर्चा केली आहे. या बैठकीला स्नॅपडील, शॉपक्ल्यूज, फ्लिपकार्ड, ग्रॉफर्स, नेटमेड्स, फार्मसइसी, १एमजीटेक, उडाण, अॅमेझॉन इंडिया, बिग बास्केट व झोमॅटोचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना परिणाम
कोरोना परिणाम

नवी दिल्ली - लॉकडाऊन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा विस्कळित होईल, या भीतीने अनेक लोक दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर औद्योगिक प्रोत्साहन व अंतर्गत विभागाने (डीपीआयआयटी) महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित चालू राहण्यासाठी डीपीआयआयटी सातत्याने ई-कॉमर्स कंपन्यांसह व्यापाऱ्यांशी चर्चा करत आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी ई-कॉमर्सचे आणि लॉजिस्टिक्स उद्योगांच्या भागीदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी चर्चा केली आहे. या बैठकीला स्नॅपडील, शॉपक्ल्यूज, फ्लिपकार्ड, ग्रॉफर्स, नेटमेड्स, फार्मसइसी, १एमजीटेक, उडाण, अॅमेझॉन इंडिया, बिग बास्केट व झोमॅटोचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेट्रो कॅश अँड कॅरी, वॉलमार्ट, डिल्हिव्हरी, सेफएक्सप्रेस, पेटीएम आणि स्विग्गीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा-बँकांच्या शाखांचे कामकाज सुरू, अफवांवर विश्वास ठेवू नये - सरकारचे आवाहन

वस्तू पुरवठा साखळीचे कामकाज कसे हाताळावे, यासाठी राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालय आणि डीपीआयआयटीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

हेही वाचा-मंदीची भीती : सलग तीन दिवस वधारल्यानंतर मुंबई शेअर बाजारात घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details