नवी दिल्ली -ज्या सॉफ्टवेअरचा गैरवापर करून पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने कोट्यवधींचा चुना लावला, त्या सॉफ्टवेअरचा वापर पुन्हा चर्चेत आला आहे. स्विफ्ट या सॉफ्टवेअरचा वापर नियमाप्रमाणे न केल्याने आरबीआयने येस बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.यासंदर्भातील माहिती येस बँकेने शेअर बाजारला दिली आहे.
स्विफ्ट प्रणालीचा गैरवापर आरबीआयच्या रडारवर, येस बँकेला १ कोटींचा दंड - येस बँक
शनिवारी आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया,देना बँक आणि आयडीबीआयला स्विफ्टचा योग्य वापर न केल्याने दंड ठोठावला. यामध्ये युनियन बँकेला ३ कोटी, देना बँकेला २ कोटी, आयडीबीआय आणि एसबीआयला १ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
स्विफ्ट हे ग्लोबल मेसेज करण्यासाठी बँकांकडून वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर आहे. स्विफ्टचा गैरवापर करून नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार कोटींची फसवणूक केली आहे. हा घोटाळा फेब्रुवारी २०१८ मध्ये झाल्यानंतर स्विफ्टमधील वापराबाबत आरबीआयने कठोर नियम केले आहेत.
शनिवारी आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिय बँक ऑफ इंडिया,देना बँक आणि आयडीबीआयला स्विफ्टचा योग्य वापर न केल्याने दंड ठोठावला. यामध्ये युनियन बँकेला ३ कोटी, देना बँकेला २ कोटी, आयडीबीआय आणि एसबीआयला १ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.