महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आरबीआयच्या समितीच्या बैठकीत अर्थव्यवस्थेबाबत चर्चा - FSDC

समितीच्या बैठकीला शेअर बाजार नियंत्रक सेबी, विमा नियामक आयरडीएआय,पेन्शन निधी नियामक पीएफआरडीए यातील अधिकाऱ्यास केंद्रीय अर्थविभागाचे अधिकारी उपस्थित होते.  तसेच फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिलचे (एफएसडीसी) अध्यक्ष तथा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास उपस्थित होते.

प्रतिकात्मक

By

Published : Mar 15, 2019, 4:07 PM IST

मुंबई- वित्तीय क्षेत्राचे नियमन करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समितीत कर्जाचे दर आणि अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या चिंतेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विविध नियमन करणाऱ्या संस्थांचे अधिकाऱ्यांसह अर्थविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

समितीच्या बैठकीला शेअर बाजार नियंत्रक सेबी, विमा नियामक आयरडीएआय,पेन्शन निधी नियामक पीएफआरडीए यातील अधिकाऱ्यास केंद्रीय अर्थविभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिलचे (एफएसडीसी) अध्यक्ष तथा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास उपस्थित होते. यावेळी देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होणाऱ्या जागतिक आणि देशातील घटनांचे पुनरावलोकन करण्यात आले. आर्थिक स्थिरता आणि अर्थसमावेशकता वाडविण्यासाठी राज्यपातळीवरील समन्वय समितींचा आढावा घेण्यात आला.


ABOUT THE AUTHOR

...view details