महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 30, 2021, 9:05 AM IST

ETV Bharat / business

आरबीआयचा दणका; कोल्हापुरच्या शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द

शिवम सहकारी बँकेचा व्यवसाय २९ जानेवारी २०२१ पासून बंद होणार असल्याचे आरबीआयने आदेशात म्हटले आहे. या बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना डिआयसीजीसीकडून ठेवींवर विमा संरक्षण आहे.

आरबीआय कारवाई न्यूज
आरबीआय कारवाई न्यूज

मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोल्हापूरमधील शिवम सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.

शिवम सहकारी बँकेचा व्यवसाय २९ जानेवारी २०२१ पासून बंद होणार असल्याचे आरबीआयने आदेशात म्हटले आहे. या बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना डिआयसीजीसीकडून ठेवींवर विमा संरक्षण आहे. अवसायानात प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवीनुसार ५ लाखापर्यंतची रक्कम डीआयजीसीकडून मिळणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

हेही वाचा-नवीन कृषी कायद्यांमुळे मुक्त बाजाराचे नवे युग सुरू होणार-आर्थिक सर्वेक्षण

आरबीआयने आदेशात काय म्हटले आहे ?

  • ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे.
  • सध्याच्या घडीला बँक ठेवीदारांचे सर्व पैसे परत देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. जर बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली तर त्याचा सार्वजनिक हितावर परिणाम होणार आहे.

आयुक्त, सहकारी आणि राज्य सहकारी संस्था निबंधक यांनी शिवम सहकारी बँकेवर अवसायक नेमण्याची आरबीआयला विनंती केली आहे. शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही.

हेही वाचा-आर्थिक सर्वेक्षणात केवळ सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक - पी. चिदंबरम

दरम्यान, शहरी सहकारी बँका आणि बहु-राज्य सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्षेत्रात गतवर्षी आणण्यात आले आहे. यापूर्वी केवळ वाणिज्य बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली होत्या. मात्र, नव्या बँकिंग नियमनामुळे रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवर देखरेख ठेवण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details