महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रतन टाटांकडून कौतुक - Balakot

काही दिवसांपूर्वी सैनिकांवर हल्ला करणाऱ्या पाकला चोख प्रत्युत्तर देणे, ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे टाटांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Feb 27, 2019, 5:02 PM IST

नवी दिल्ली - भारताच्या हवाईदलाने सीमारेषा ओलांडून पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. या सर्जिकल स्ट्राईकनंतर उद्योगपती रतन टाटा यांनी ट्विट करून भारतीय हवाईदलाचे आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.


पाकिस्तान आपल्या देशात दहशतवादी तळ नसल्याचे दावे करत होते. काही दिवसांपूर्वी सैनिकांवर हल्ला करणाऱ्या पाकला चोख प्रत्युत्तर देणे, ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे टाटांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मंगळवारी भारताने केले सर्जिकल स्ट्राईक - २
भारतीय वायूसेनेने मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ला केला. भारतीय हवाई दलाच्या 'मिराज २०००' जातीच्या १२ विमानांनी जैशच्या तळावर १ हजार किलोचे बॉम्ब टाकले आहेत. या हवाई हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'मिराज २०००' या विमांनानी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 'बालाकोट येथील जैशचा सर्वांत मोठ्या तळावरील शेकडो दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक, वरिष्ठ कमांडर्स आणि जिहादी मारले गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details