नवी दिल्ली - आयटी कंपन्यांची मुख्य संघटना असलेल्या नॅसकॉमने संपूर्ण लॉकडाऊनसाठी तयार राहण्याची कंपन्यांना सूचना केली आहे. केवळ अत्यंत महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवा, असेही नॅसकॉमने म्हटले आहे.
संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करा; केवळ महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा - नॅसकॉम
कोरोनाचा देशात प्रसार वाढत असताना काही राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. फक्त महत्त्वाच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांना बोलवा, असे नॅसकॉमने म्हटले आहे.
कोरोना
कोरोनाचा देशात प्रसार वाढत असताना काही राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. फक्त महत्त्वाच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांना बोलवा, असे नॅसकॉमने म्हटले आहे. अन्यथा सरकारचा आपण विश्वास गमविण्याची भीती असल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे. कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जवळ आयडी ठेवावे, असे नॅसकॉमने आवाहन केले आहे.