नवी दिल्ली - पंतप्रधान हे मोरांबरोबर व्यस्त आहेत. त्यामुळे लोकांनी स्वत:चे जीवन वाचविण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचा लोकांना सल्ला दिल्याची उपरोधिक टीका राहुल गांधींनी केली. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राहुल गांधींनी मोदी सरकारवर आज निशाणा साधला आहे.
चालू आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० लाखांहून अधिक होईल, असा राहुल गांधींनी ट्विट करून अंदाज केला. तर सक्रिय असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाखांहून अधिक होईल, असेही गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले, नियोजन नसलेली टाळेबंदी हे एका व्यक्तीच्या अहंकाराचे प्रतिक आहे. त्यामुळे देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरत गेला आहे. मोदी सरकारने आत्मनिर्भर होण्यास सांगितले आहे. त्याचा अर्थ तुमचे आयुष्य तुम्हीच वाचवायचे आहे. कारण पंतप्रधान हे मोरांसोबत व्यस्त आहेत.