बंगळुरू - डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेने देशात 25 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांच्या संख्येचा टप्पा ओलांडला असल्याचा दावा केला आहे.
ऑक्टोबरमध्ये कंपनीने 10 कोटी मासिक सक्रिय वापरकर्ते (एमएयू) आणि 230 कोटी अॅप सेशनची नोंद केली.
फोनपे चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक समीर निगम म्हणाले, 'आमचे पुढील लक्ष्य डिसेंबर 2022 पर्यंत 50 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या पार करण्याचे आहे.'
ऑक्टोबर महिन्यात 92.5 कोटींच्या देवघेवीचे व्यवहार फोनपेद्वारे करण्यात आले, असे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये वार्षिक टीपीव्ही (एकूण देय मूल्य) 27 हजार 700 कोटी डॉलर्सचे होते. तर, ऑक्टोबरमध्येच कंपनीने 83.5 कोटींचे देवघेवीचे व्यवहार यूपीआयद्वारे केले गेले. यामध्ये बाजारातील 40 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.