महाराष्ट्र

maharashtra

अॅपलची 'ही' पुरवठादार कंपनी देशात सुरू करणार उत्पादन प्रकल्प

By

Published : Jul 18, 2020, 4:47 PM IST

Updated : Jul 18, 2020, 8:33 PM IST

तामिळनाडू उद्योग मंत्रालयाचे सचिव एन मुरुगननंदनम ई टीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, राज्य सरकारने फॉक्सकॉन कंपनीबरोबर यापूर्वीच सामंजस्य करार केला आहे. ही कंपनी अॅपलची पुरवठादार कंपनी आहे.

संग्रहित
संग्रहित

चेन्नई - अॅपल फोन असेंबल करणारी पेगाट्राॅन काॅर्प कंपनी भारतामध्ये पहिला उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. त्यासाठी कंपनीने व्यवहार मंत्रालयाकडे चेन्नईच्या पत्त्यावर नोंदणी केली आहे.

पेगाट्राॅन काॅर्प टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने 14 जुलै 2020 रोजी अॅपलच्या पुरवठादार कंपनीने नोंदणी केली आहे. या कंपनीत अखिलेश बन्सल आणि चाऊ तालिन यांची संचालकपदी निवड झाली आहे.

कंपनीची केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. आम्ही त्यांना राज्यपातळीवर चर्चेसाठी आमंत्रित करणार आहोत. त्यांना भारतामध्ये कंपनी सुरू करण्यासाठी सुविधा देणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ई-टीव्ही भारतला सांगितले.

तामिळनाडू उद्योग मंत्रालयाचे सचिव एन मुरुगननंदनम ई टीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, राज्य सरकारने फॉक्सकॉन कंपनीबरोबर यापूर्वीच सामंजस्य करार केला आहे. ही कंपनी अॅपलची पुरवठादार कंपनी आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर कंपनीच्या देशातील गुंतवणुकीला गती येणार आहे. फॉक्सकाॅन ही कंपनी चेन्नईजवळील श्रीपेरुमबुदूर येथे आयफोन एक्सआरचे असेंम्बलिंग करते. या प्रकल्पात कंपनी येत्या तीन वर्षात आणखी एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

Last Updated : Jul 18, 2020, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details