नवी दिल्ली - राजधानीसह देशात कांद्याचा भाव हा प्रति किलोला ७० ते ८० रुपये झाला आहे. नवे खरीप पीक बाजारात आल्यानंतर कांद्याचे दर कमी होतील, असे मत नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
कांद्याचे भाव नोव्हेंबरपासून उतरतील - नीती आयोग
नाफेड आणि एनसीसीएफसारख्या संस्था कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राखीव साठा बाजारात खुला करत आहेत. दिल्लीतील मदर डेअरीच्या सफल विक्री केंद्रातून कांदा २३.९० रुपये किलो एवढ्या स्वस्त दराने विकण्यात येत आहे.
नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद म्हणाले, आमच्याकडे ५० हजार टन कांद्याचा राखीव साठा आहे. यापूर्वी आम्ही १५ हजार टन कांद्याचा राखीव असलेला साठा बाजारात खुला केला आहे. दोन महिन्यानंतर कांद्याचा राखीव साठा बाजारात खुला करण्यावर विचार करत आहोत. नोव्हेंबरच्या सुरुवातीला खरीप पीक बाजारात आल्यानंतर स्थिती सामान्य होईल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, दरवर्षी कांद्याच्या दरवाढीचा गंभीर प्रश्न उद्भवतो. कांदा हा चर्चेचा केंद्रबिंदू झाला आहे. कांद्याचे दर अचानक २ ते ३ पटीने वाढले आहे. आम्हाला त्याबाबत कल्पना आली नव्हती. अवकाळी पाऊस अथवा पुराचे भाकीत करता येत नाही. मात्र, कांद्याचा तुटवडा होवू शकतो, ही भाकीत करणाऱ्या यंत्रणेची गरज आहे. त्यामुळे आपण कांद्याची भाववाढ होण्यापूर्वी आयात करू शकतो. भारतीय शेती ही व्यापारीकरणाच्या उच्च पातळीवर पोहोचल्याचेही चंद यांनी सांगितले.
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू-
नाफेड आणि एनसीसीएफसारख्या संस्था कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राखीव साठा बाजारात खुला करत आहेत. दिल्लीतील मदर डेअरीच्या सफल विक्री केंद्रातून कांदा २३.९० रुपये किलो एवढ्या स्वस्त दराने विकण्यात येत आहे. इतर राज्यही कांद्याचा राखीव साठा घेवून त्यांच्या राज्यात विक्री करत आहेत.