महाराष्ट्र

maharashtra

वनप्लस कंपनी सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेत आणणार टीव्ही

By

Published : Aug 21, 2019, 3:57 PM IST

वनप्लसचे सीईओ पेटे लायू म्हणाले,  कंपनी ही पहिल्यांदा भारतामध्ये टीव्ही उत्पादन उपलब्ध करून देणार आहे. भारतामधील कंटेन्ट पुरवठा देणाऱ्यांशी चांगल्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वनप्लस

बीजिंग - चीनी वनप्लस मोबाईल कंपनीने भारतीय बाजारपेठेत टीव्ही आणण्याचा निर्णय घेतला आहे. वनप्लस पहिल्यांदा भारतामधील बाजारपेठेत सप्टेंबरमध्ये टीव्ही लाँच करणार आहे.

वनप्लसचे सीईओ पेटे लायू म्हणाले, कंपनी ही पहिल्यांदा भारतामध्ये टीव्ही उत्पादन उपलब्ध करून देणार आहे. भारतामधील कंटेन्ट पुरवठा देणाऱ्यांशी चांगल्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याशी आम्ही भागीदारी करणार आहोत. त्यामुळे वापरकर्त्यांना चांगला कंटेन्ट मिळण्याची खात्री आहे.
हा टीव्ही नॉर्थ अमेरिका, युरोप आणि चीनमध्येही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यापूर्वी कंटेन्ट पुरवठा करणाऱ्यांबरोबर भागीदारी करणार असल्याचे पेटे लायू यांनी सांगितले. वनप्लस टीव्ही हा अँड्राईडसह ४३ ते ७५ इंचच्या एलईडी पॅनेलमध्ये उपलब्ध असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details