नवी दिल्ली- विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत महानगरांमध्ये ५० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हे दर १ मार्चपासून लागू झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत सहावेळा विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. ऑगस्टनंतर प्रथमच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.
ग्राहकांना दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरसाठी (१४.२ किलो) ८०५.५ रुपये द्यावे लागणार आहेत. रविवारपासून नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ५३ रुपयांनी कमी झाली आहे. यापूर्वी ग्राहकांना विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी ८५८ रुपये द्यावे लागत होते. कोलकात्यामध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी ८३९ रुपये, मुंबईमध्ये ७७६.५ रुपये आणि चेन्नईमध्ये ८२६ रुपये द्यावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या महिन्यांतील आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे लागू करण्यात आले आहेत. ऑगस्ट ते फेब्रुवारीदरम्यान विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती सुमारे ५० टक्क्यांनी वाढल्या होत्या.