नवी दिल्ली- टाळेबंदीदरम्यान जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढत असताना केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बाजारातील वस्तुंची साठेबाजी व जीवनावश्यक वस्तूच्या एमआरपीपेक्षा (कमाल किरकोळ किंमत) जास्त नसाव्यात, यासाठी सरकार कडकपणे देखरेख करत असल्याचे पासवान यांनी सांगितले.
पालेभाज्या, गहू, डाळी व तांदूळ यांच्या किमतीवर देखरेख ठेवण्यात येत आहे. टाळेबंदीत व नंतरही सर्व जीवनावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध असणार आहेत, याची ग्वाही देत असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले.