नागपूर- देयके मिळत नसणे ही सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची मुख्य डोकेदुखी असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. त्यावर मार्ग काढण्यासाठी ठोस निर्णय घेवू, असे त्यांनी आश्वासन दिले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या लघू उद्योग भारतीच्या कार्यक्रमात बोलत होते.
येत्या पाच वर्षात नवी दिल्ली प्रदूषणमुक्त करू, असे आश्वासन नितीन गडकरींनी दिले. पुढे ते म्हणाले, लहान उद्योगांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपते. त्यावर गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. खासगी क्षेत्र असो अथवा सरकार एमएमएमई क्षेत्राची देयके ४५ दिवसात द्यायला पाहिजेत.